
सिंधुदुर्ग ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित अंडर १६ निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट संघामध्ये एम क्रिकेट अकादमीच्या (सावंतवाडी) सात खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

अंडर १६ निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धा एक मेपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला. चौदा खेळाडूंच्या संघात सावंतवाडी येथील एम क्रिकेट अकादमीच्या फुदेल आगा, दत्ता नाईक, गणेश गावडे, यश पाटकर, भगवान पांढरे, वेद मळीक, रितिक बुरुड या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच वेस्ट झोनच्या संघात सुहान बांदेकर व प्रिन्स प्रसाद यांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंना अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल रेगे तर सहाय्यक प्रशिक्षक अविनाश जाधव, सोहम पावसकर व नागेश रेगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंना अकादमीचे अध्यक्ष उदय नाईक यांनी अभिनंदन करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एम क्रिकेट अकादमीने सातत्यपूर्ण कामगिरी करत नऊ खेळाडू घडवले आहेत. हे खेळाडू महाराष्ट्राच्या निमंत्रिताच्या सामन्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
