
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राद्वारे विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय क्रीडा संकुल येथे ॲथलेटिक्स या खेळाचे मोफत प्रशिक्षण दररोज दोन सत्रामध्ये अॅथलेटिक्स प्रशिक्षक पूनम नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थी व खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.