
मुंबई ः बँकॉक, थायलंड येथे झालेल्या चौथ्या आशिया कप क्वालिफायर स्पर्धेमध्ये भारतीय महिला बेसबॉल संघाने रौप्य पदक पटकावले आहे. भारतीय बेसबॉल संघ हा चौथ्या आशियाई कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
चौथी आशियाई कप स्पर्धा २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणार आहे. भारतीय महिला बेसबॉल संघाचे नेतृत्व रेश्मा पुणेकर हिने केले. भारतीय बेसबॉल संघामध्ये महाराष्ट्राच्या रेश्मा पुणेकर (कर्णधार), ज्योती पवार व विद्या गिरी या तीन महिला खेळाडू संघांनी प्रतिनिधीत्व केले. भारतीय महिला बेसबॉल संघाचे अम्यॅचुअर भारतीय बेसबॉल संघाचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र बेसबॉल संघाचे सरचिटणीस राजेंद्र इखणकर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.