
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा – प्रवीण देशेट्टीचे शानदार शतक
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूट संघाने रेल्वेच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन अ गट क्रिकेट स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात रेल्वेने भंडारी स्पोर्ट्स क्लबचा ८० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रेल्वेने सर्वबाद २३२ धावा केल्या. विजयी २३३ धावांचे लक्ष्य भंडारी स्पोर्ट्स् संघाला पेलवले नाही. त्यांचा डाव रेल्वेने १५२ धावांत गुंडाळला. शानदार शतक झळकावणारा प्रवीण देशेट्टी सामन्याचा मानकरी ठरला. त्यास लियाकत शेख यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून अमोल अंगडी व नितीन गायकवाड तर गुणलेखक म्हणून सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक
मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट, सोलापूर – ३४.२ षटकांत सर्व बाद २३२ (प्रवीण देशेट्टी ११७, परमजित कदम ३६, अझहर अलगुर ३०, अनिल सलगर ३ बळी, युवराज थेवर, वैभव लाड व आर्यन काळे प्रत्येकी २ बळी, सोमनाथ भरले १ बळी) विजयी विरुद्ध भंडारी स्पोर्ट्स क्लब : ३०.२ षटकांत सर्वबाद १५२ (आर्यन काळे ३०, अनिल सलगर २२, हार्दिक मोटे २१ धावा, आशिष अवळे ४ बळी, अमन सय्यद ३ बळी, वेदांत काळे, अझहर अलगुर व संजय राठोड प्रत्येकी १ बळी).