
सोलापूर ः सोलापूर चेस अकादमीच्या वतीने सोलापूर येथे ५ ते १० मे या कालावधीत सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत जुळे सोलापुर, एम्प्लॉयमेंट चौक, अशोक चौक व बाळीवेस अशा शहरातील विविध ठिकाणी बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात बुद्धिबळातील विविध कौशल्ये, मध्य व अंतिम पर्वातील डावपेच, आक्रमण व बचावाची तंत्रे, डावाच्या सुरुवातीच्या चालींचे महत्व, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या डावातील विश्लेषण तसेच हत्ती व प्याद्याच्या अंतिम पर्वातील बारकाव्याबाबतचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय खेळाडूंसाठी तसेच चार वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतचे नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंकरिता शिबीर संपन्न होणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी स्पर्धा देखील होणार असून स्पर्धेत प्रथम येणाऱ्या तीन खेळाडूंना आकर्षक मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी खेळाडूंनी अकादमीचे मुख्य व राष्ट्रीय प्रशिक्षक सुमुख गायकवाड (८८३०४३२१८४) व उदय वगरे (८८८८०४५३४४) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी केले आहे.