
मुंबई: सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक २०२५ मध्ये शायन राझमीने आपल्या गटामध्ये वर्चस्व गाजवताना ब्रिटिश रॉयल एअर फोर्सचे माजी पायलट आणि ग्रेट ब्रिटनमधील अनेक थ्री- बॉल क्यू स्पोर्ट स्पर्धांचे विजेते मार्टिन गुडविलवर ४०९-४०३ असा विजय मिळवला. गुडविल हा आठ वर्षांपासून सौदी अरेबियामध्ये पायलट प्रशिक्षक होते आणि सध्या ते जागतिक बिलियर्ड्सचे प्रमुख, प्रशिक्षक आहेत.
सीसीआयच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स रूममध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत राझमीने रफाथ हबीबचा ५१६-३८० असा पराभव केला. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सेटमधील इतर विजेते नलिन पटेल होते. त्यांनी अक्षय गोगरीचा ७५०-२७८ असा पराभव केला. पटेलचा हा गटातील दुसरा विजय होता.
इतर सामन्यांमध्ये सिद्धार्थ पारीखने त्याच्या गटात दुसरा विजय नोंदवला. त्याने अक्षय गोगरीवर ७९९-२३० अशी मात केली. ध्वज हरियाने अमित सप्रूवर १२२२-१०० असा विजय मिळवला. त्यात २६० आणि २५३ असे द्विशतक आणि १९० आणि १०२ असे शतकी ब्रेक होते. चॅम्पियन क्यूइस्ट पंकज अडवाणीने १८९ आणि १०९ अशा ब्रेकसह अशोक शांडिल्यचा ७७७-३८७ असा पराभव केला.