संघर्ष अकादमीचा एमजीएम अकादमीवर ४० धावांनी विजय 

  • By admin
  • May 2, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

युनिव्हर्सल वन-डे लीग क्रिकेट ः रुद्रांश तिलकरी, अनिल जाधवची प्रभावी कामगिरी 

छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित अंडर १६ एकदिवसीय क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत संघर्ष क्रिकेट अकादमी संघाने एमजीएम क्रिकेट अकादमी संघावर ४० धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात रुद्रांश तिलकरी याने सामनावीर पुरस्कार संपादन केला. 

युनिव्हर्सल क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी अंडर १६ वयोगटातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या सामन्यात संघर्ष क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करत २९.२ षटकात सर्वबाद १४० अशी धावसंख्या उभारली. प्रत्युतरात एमजीएम क्रिकेट अकादमी संघ २६.४ षटकात १०० धावांवर सर्वबाद झाल. संघर्ष अकादमीने ४० धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात सोहम सपकाळ याने ५५ चेंडूत ४७ धावांची बहारदार खेळी केली. सोहमने सहा चौकार मारले. त्याचे अर्धशतक केवळ तीन धावांनी हुकले. उदय इरतकर याने ३८ चेंडूत ३१ धावा फटकावल्या. उदयने चार चौकार मारले. रुद्रांश तिलकरी याने १६ चेंडूत २१ धावांची आक्रमक खेळी केली. रुद्रांश याने दोन चौकार मारले. गोलंदाजीत अनिल जाधव याने २७ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. अनिलने प्रभावी गोलंदाजी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रुद्रांश तिलकरी याने २५ धावांत चार विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अष्टपैलू कामगिरीमुळे रुद्रांश सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. विकास कल्याणकर याने ३० धावांत तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक  

संघर्ष क्रिकेट अकादमी ः २९.२ षटकात सर्वबाद १४० (सोहम सपकाळ ४७, अयान अन्सारी ८, जीवन काटकर १४, साई स्वामी ६, दुर्वांक कुलकर्णी १२, सर्वेश ६, रुद्रांश तिलकरी नाबाद २१, इतर २०, अनिल जाधव ५-२७, विकास कल्याणकर ३-३०, उदय इरतकर २-२२) विजयी विरुद्ध एमजीएम क्रिकेट अकादमी ः २६.४ षटकात सर्वबाद १०० (स्वरित दरक १८, समर्थ पुरी ८, विकास कल्याणकर ५, उदय इरतकर ३१, आदित्य जीवरग नाबाद ८, इतर १९, रुद्रांश तिलकरी ४-२५, दुर्वांक कुलकर्णी २-५०, सर्वेश १-७, साई स्वामी १-१). सामनावीर ः रुद्रांश तिलकरी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *