
पुणे ः एमसीए अंडर १६ लीग क्रिकेट स्पर्धेत ज्युडिशियल क्रिकेट संघाने जालना संघाचा एक डाव आणि २६० धावांनी पराभव केला. या सामन्यात अर्जुन सोनार हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

ए टू झेड क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. ज्युडिशियल संघाने प्रथम फलंदाजी करत ७१ षटकात आठ बाद ४१५ असा धावांचा डोंगर उभारुन डाव घोषित केला. त्यानंतर जालना संघाचा पहिला डाव २५ षटकात अवघ्या ४९ धावांत गडगडला. त्यामुळे ज्युडिशियल संघाने जालना संघाला फॉलोऑन दिला. फॉलोऑनमध्ये दुसरा डाव खेळताना जालना संघ २७.१ षटकात १०६ धावांवर सर्वबाद झाला. ज्युडिशियल संघाने एक डाव आणि २६० धावांनी दणदणीत विजय नोंदवला.
या सामन्यात अर्जुन सोनार (१४७), युग जोशी (१०३), शाकीब शेख (४०) यांनी फलंदाजीत शानदार कामगिरी बजावली. गोलंदाजीत हर्ष नलावडे (५-३०), अर्जुन सोनार (४-१४), शाकीब शेख (३-१६) यांनी प्रभावी कामगिरी नोंदवली.