
फ्लोअर बॉल स्पर्धेत विद्यापीठ संघाची शानदार कामगिरी
जळगाव ः अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर रावेर येथील श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाच्या तीन महिला खेळाडूंनी विद्यापीठ फ्लोअर बॉल स्पर्धेमध्ये कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना कांस्य पदकाची कमाई केली.
जेजेटीयू विद्यापीठ झुनझुनु राजस्थान येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ महिला व पुरुष फ्लोअर बॉल स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाने चमकदार कामगिरी नोंदवत कांस्यपदक पटकावले. या पदक विजेत्या संघात श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर येथील महिला खेळाडू हर्षा पवार, रुतिका इंगळे, मानसी पाटील या खेळाडूंचा समावेश होता.
या संघाने अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून कांस्यपदक मिळवले. त्यात रावेरच्या महाविद्यालयातील खेळाडूंचा मोलाचा वाटा राहिला.
या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष हेमंतशेठ नाईक, संस्थेचे सदस्य डॉ प्रतीक नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस यु पाटील, प्रा संदीप धापसे, प्रा सत्यशील धनले, डॉ बाळासाहेब मुख्यदल, क्रीडा समितीचे सदस्य प्रा चतुर गाडे, प्रा नरेद्र घुले यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.