
प्रोफेशनल क्रिकेट अकादमी९९ क्रिकेट ः देवव्रत पवार, सुनील भोपळे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट अकादमी ९९ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत प्रोफेशनल क्रिकेट अकादमी ९९ अ संघाने वायएल क्रिकेट अकादमीचा अटीतटीच्या सामन्यात एक विकेट राखून पराभव केला. सीके स्पोर्ट्स संघाने पीसीए ९९ अ संघावर सहा विकेट राखून विजय नोंदवला. या लढतींत देवव्रत पवार व सुनील भोपळे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

प्रोफेशनल क्रिकेट अकादमी ९९चे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी अंडर १४ या वयोगटातील खेळाडूंना एक दर्जेदार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात वायएल क्रिकेट अकादमीने १५.३ षटकात नऊ बाद १३६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात प्रोफेशनल क्रिकेट अकादमी ९९ संघाने १८.२ षटकात नऊ बाद १३७ धावा फटकावत एक विकेट राखून सामना जिंकला.

या सामन्य़ात देवव्रत पवार याने सर्वाधिक ८८ धावांची दमदार खेळी केली. त्याने १५ चौकार मारले. रणवीर लोंढे याने अवघ्या ११ चेंडूत ४२ धावांची वादळी खेळी केली. त्याने चार चौकार व चार टोलेजंग षटकार मारले. अर्णव वाघोले याने ३९ धावांची वेगवान खेळी केली. त्याने सहा चौकार मारले. गोलंदाजीत ओम रावळे याने १९ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. जिने याने ३१ धावांत तीन गडी बाद केले. कुणाल याने २५ धावांत दोन बळी घेतले.
सीके स्पोर्ट्स विजयी
दुसऱया सामन्यात सीके स्पोर्ट्स संघाने पीसीए ९९ अ संघाचा सहा विकेट राखून पराभव केला. पीसीए ९९ अ संघाने २१.१ षटकात सर्वबाद ८२ धावा काढल्या. सीके स्पोर्ट्स संघाने ८.२ षटकात चार बाद ८३ धावा फटकावत सहा गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात स्वरित दरक (२२), परी सोनार (२१), स्वराज पाटील (१८) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत सुनील भोपळे (३-१७), अभिषेक कुचेकर (२-१६) व रुद्र जी (२-१६) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.

संक्षिप्त धावफलक ः १) वायएल क्रिकेट अकादमी ः १५.३ षटकात नऊ बाद १३६ (अर्णव वाघोले ३९, आदित्य ११, कुणाल १८, रणवीर लोंढे ४२, इतर १७, ओम रावळे ४-१९, देवव्रत पवार २-१५, वरद १-१९, रितेश घाडगे १-१०, शंतनु महाडिक १-२) पराभूत विरुद्ध प्रोफेशनल क्रिकेट अकादमी ९९ अ संघ ः १८.२ षटकात नऊ बाद १३७ (देवव्रत पवार ८८, ओम रावळे १२, इतर ३१, जिने ३-३१, कुणाल २-२५, रणवीर लोंढे १-२८, प्रेम यन्नावार १-१९). सामनावीर ः देवव्रत पवार.

२) पीसीए९९ अ संघ ः २१.१ षटकात सर्वबाद ८२ (सर्वेश बालाप ८, तनिष्क सावरकर ५, शंतनू महाडिक १३, रितेश घाडगे नाबाद १४, इतर २८, सुनील भोपळे ३-१७, अभिषेक कुचेकर २-१६, रुद्र २-१६, स्वराज पाटील १-१, वेद महाजन १-७, स्वरित दरक १-२) पराभूत विरुद्ध सीके स्पोर्ट्स ः ८.२ षटकात चार बाद ८३ (स्वरित दरक २२, स्वराज पाटील १८, परी सोनार नाबाद २१, इतर १९, ओम रावळे १-२१, सुदर्शन पाटील १-२१, रितेश घाडगे १-७, मोहम्मद साद १-१). सामनावीर ः सुनील भोपळे.