पीसीए९९ ब आणि क संघांचे चुरशीचे विजय

  • By admin
  • May 2, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

प्रोफेशनल क्रिकेट अकादमी अंडर १४ क्रिकेट ः विक्रांत भोसले, हुजेफा पठाण सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट अकादमी९९तर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत पीसीए९९ ब आणि क या संघांनी चुरशीच्या सामन्यात विजय साकारत आगेकूच केली. या सामन्यात विक्रांत भोसले आणि हुजेफा पठाण यांनी सामनावीर पुरस्कार मिळवला.

पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पीसीए९९ अ संघाला पीसीए९९ ब संघाकडून तीन विकेटने पराभव स्वीकारावा लागला. पीसीए९९ अ संघाने प्रथम फलंदाजी करत २५ षटकात तीन बाद १७८ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात पीसीए९९ ब संघाने २२.५ षटकात सात बाद १८४ धावा फटकावत तीन विकेटने सामना जिंकला.

दुसऱया सामन्यात पीसीए९९ क संघाने पीसीए९९ अ संघावर एक विकेट राखून विजय साकारला. या सामन्यात पीसीए९९ अ संघाने प्रथम फलंदाजी करताना १७.२ षटकात सर्वबाद ११० धावा काढल्या. पीसीए९९ क संघाने २० षटकात नऊ बाद ११३ धावा फटकावत एक विकेट राखून सामना जिंकला.

या सामन्यात देवव्रत पवार (६१), आदर्शराजे घोलप (५३) यांनी शानदार अर्धशतके साजरी केली. कार्तिक भारद्वाज याने अवघ्या २६ चेंडूत ४९ धावा फटकावल्या. त्याने तीन षटकार व सहा चौकार मारले. गोलंदाजीत सुदर्शन पाटील (२-२१), रितेश घाडगे (२-२९), ओम रावळे (२-२४) यांनी प्रभावी गोलंदाजी करुन लक्षवेधून घेतले.

पीसीए९९ क विजयी
दुसऱया सामन्यात पीसीए९९ क संघाने चुरशीच्या सामन्यात पीसीए९९ अ संघावर एक विकेट राखून रोमांचक विजय संपादन केला. पीसीए९९ अ संघाने १७.२ षटकात सर्वबाद ११० धावा काढल्या. पीसीए९९ क संघाने २० षटकात नऊ बाद ११३ धावा फटकावत एक विकेटने सामना जिंकला.

या सामन्यात कारक भारद्वाज (३५), विनीत पैठणपगारे (२२), गायत्री झिरपे (२१) यांनी चमकदार फलंदाजी केली. गोलंदाजीत आदर्शराजे घोलप याने २९ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. हुजेफा पठाण याने ११ धावांत तीन तर अंगराज याने १५ धावांत तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

१) पीसीए९९ अ संघ ः २५ षटकात तीन बाद १७८ (देवव्रत पवार ६१, आदर्शराजे घोलप ५३, गायत्री झिरपे नाबाद २७, इतर २८, विकी भोसले १-३४, ज्योतिरादित्य राजगुरू १-३२) पराभूत विरुद्ध पीसीए९९ ब संघ ः २२.५ षटकात सात बाद १८४ (गार्गी तलवंडे ९, विकी भोसले २७, ज्ञानेश्वरी बारगळ ९, अनिश शिंदे १२, प्रणव कदम नाबाद ३४, कार्तिक भारद्वारज नाबाद ४९, इतर ३७, सुदर्शन पाटील २-२१, रितेश घोडगे २-२९, ओम रावळे २-२४, वरद १-१२). सामनावीर ः विकी भोसले.

२) पीसीए९९ अ ः १७.२ षटकात सर्वबाद ११० (आदेश बंगाल ८, आदर्शराजे घोलप ७, तनिष्क सावरकर १३, गायत्री झिरपे २१, देवव्रत पवार ९, शंतनू महाडिक १९, इतर ३०, हुजेफा पठाण ३-११, अंगराज सिंग १-१५, शौर्य राजपूत २-१४, देवेंद्र १-१५, सोहम पिंपळे १-१७) पराभूत विरुद्ध पीसीए९९ क संघ ः २० षटकात नऊ बाद ११३ (विनीत पैठणपगारे २२, कारक भारद्वाज ३५, सोहम पिंपळे १५, इतर २९, आदर्शराजे घोलप ५-२९, मोहम्मद साद १-१०, रितेश घाडगे १-५, सुदर्शन पाटील १-१६). सामनावीर ः हुजेफा पठाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *