
रोहित तुपारे कर्णधारपदी
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सॉफ्टबॉल पुरुषांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी आंध्र प्रदेश येथे रवाना झाला आहे. संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अनुभवी राष्ट्रीय खेळाडू रोहित तुपारे याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
विक्रमा सिहपुरी विद्यापीठ, नेल्लोर (आंध्र प्रदेश) येथे ४ ते ८ मे दरम्यान अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पुरुषांची सॉफ्टबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुरुषांचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
विद्यापीठ संघात रोहित तुपारे (कर्णधार), यश थोरात, निखिल वाघमारे, चेतन बोरकर, नयन दुरूगकर, गौरव साळवे, विकी वाहूळकर, अदनान पठाण, दीपक भवर, गौतम बोरुडे, आकाश बामणे, रेवण कदम, साईदीप भालेराव, कार्तिक तांबे, आदित्य नागरे, कुणाल चव्हाण यांचा समावेश आहे. या संघा सोबत प्रशिक्षक म्हणून रवी खरात तर व्यवस्थापक म्हणून डॉ अशोक कांबळे हे रवाना झाले आहेत.
या संघाला कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, डॉ फुलचंद सलामपुरे, जिल्हा संघटनेचे गोकुळ तांदळे, दीपक रुईकर, क्रीडा विभागाचे प्रशिक्षक डॉ मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीतसिंग दिक्कत, गणेश कड, मोहन वहीलवार, डॉ रामेश्वर विधाते यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.