मेसा संघटना पदाधिकाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना आभार पत्र 

  • By admin
  • May 2, 2025
  • 0
  • 70 Views
Spread the love

इंग्रजी शाळांसाठी ४३ कोटी आरटीई रक्कम मंजूर केल्याबद्दल मानले आभार 

छत्रपती संभाजीनगर ः राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे एका कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आले असताना मेसा संघटनेच्या पदाधिकाऱयांनी मंत्री भुसे यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. 


देवगिरी कॉलेज येथे एका कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आले होते. त्यावेळी मेसा संघटनेच्या पदाधिकारी यांनी दादा भुसे यांची भेट घेतली व आभार पत्र देऊन आभार मानले.

१८ जानेवारी २०२५ रोजी मेसा संघटनेच्या पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सटाना मालेगाव येथे भेट घेऊन मेसा संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या इंग्रजी शाळांसाठी ४३ कोटी मंजूर केले. त्यामुळे न्यायालयीन प्रकारणातील ६१ इंग्रजी शाळांना व इतर सर्व इंग्रजी शाळांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४चे १०० टक्के आरटीई प्रतिपूर्ती रक्कम मंजूर करून इंग्रजी शाळांना दिलासा दिल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना मेसा संघटनेच्या पदाधिकारी यांनी आभार पत्र देऊन आभार मानले व यापुढे आपले असेच सहकार्य मिळावे अशी इच्छा आभार पत्राच्या माध्यमांतून व्यक्त केली.

तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आलेले आरटीई प्रतिपूर्ती रक्कम ४३ कोटी तात्काळ वाटप केल्याबद्दल जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, कक्ष अधिकारी प्रदीप राठोड, आरटीई कक्ष अधिकारी संगीता सावळे व आरटीई कक्ष लिपिक सुरज राजपूत यांना मेसा संघटनेच्या पदाधिकारी यांनी स्मृतिचिन्ह व शाल देऊन आभार मानले.

यावेळी मेसा संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा प्रवीण आव्हाळे, राज्य सरचिटणीस संदीप लघाने पाटील, राज्य कोषाध्यक्ष डॉ संजय पाटील, जिल्हा अध्यक्ष सुनील मगर पाटील, जिल्हा सचिव प्रा अक्षय न्यायाधीश, सदस्य ऋषिकेश जोशी, प्रियंका राणा, प्रीती डोके व सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *