
सोलापूर ः पटना (बिहार) येथे ११ ते १५ मे या कालावधीत होणाऱ्या सातव्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी सोलापूरच्या प्रथमेश कस्तुरे व आदित्य निकते यांची निवड झाली आहे.
रुद्रपुर, उत्तराखंड येथे झालेल्या १९व्या कॅडेट राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरीवर त्यांची निवड झाली आहे. हे दोन्ही खेळाडू ईप्पी हा प्रकार खेळत असून बी एफ दमाणी प्रशालेचे विद्यार्थी आहेत. या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे झाले आहे. हे दोन्ही खेळाडू ऑल स्टार फेन्सिंग क्लबचे असून त्यांना पवन भोसले, वेदांत पवार व सोहम साठे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा प्रकाश काटुळे व जिल्हा सचिव प्रा दीपक शदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांचे संघटना सदस्य जितेंद्र पवार, अनिल पाटील व राजेंद्र गोटे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.