
सोलापूर ः राज्यस्तरीय शालेय युनिफाईट स्पर्धेमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील खेळाडूंनी १३ पदकांची कमाई केली आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालय, युनिफाईट वेलफेअर असोसिएशन सोलापूर व महाराष्ट्र युनिफाईट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजवैभव सांस्कृतिक भवन, नातेपुते (ता. माळशिरस) येथे झालेल्या या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक भीमराव बाळगे, इकबाल शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संघ प्रशिक्षक म्हणून मनोज बाळगे व संघ व्यवस्थापक प्राची जोगदांडे यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य युनिफाईट अध्यक्ष संतोष खंदारे, राज्य सचिव मंदार पनवेलकर, स्पर्धा संयोजक मनोज राऊत व तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी परिश्रम घेतले.
विजयी खेळाडूंचे जिल्हा किकबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष महादेव चाकोते, जिल्हा युनिफाईट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष महेश इंगळे, राज्य किकबॉक्सिंग उपाध्यक्ष मनीष सुरवसे, जिल्हा शिकाई अध्यक्ष मुकुंदराव जाधव व शिवकुमार पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंची चमकदार कामगिरी
सुवर्णपदक – १९ वर्षांखालील मुली ः ४१ किलो नक्षत्र भोसले, ५६ किलो – श्रावणी डांगे (दोघी सिद्धेश्वर कन्या प्रशाला), ५० किलो – संस्कृती अंजीखाने, ५३ किलो – पौर्णिमा पुजारी (दोघी संगमेश्वर महाविद्यालय). मुले ः ५० किलो – श्रावण वालीकर, ५३ किलो – संगमेश्वर शिरोळकर (दोघे संगमेश्वर महाविद्यालय).
रौप्यपदक – १९ वर्षाखालील मुली ः ३८ किलो – संस्कृती सातपुते, ५६ किलो – जिक्रा शेख (दोघी सिद्धेश्वर कन्या प्रशाला). १७ वर्षाखालील मुली ः ३३ किलो – मानसी टंगसाळी, ३६ किलो- ऋतुजा भास्कर, ३९ किलो- तपस्या सारंगमठ, ५१ किलो – श्रावणी लामजणे (सर्व सिद्धेश्वर कन्या प्रशाला), ४५ किलो – मधीन बसरी (हिंदुस्थान स्कूल).