
नागपूर (सतीश भालेराव) : स्कूल ऑफ स्कॉलर्स हुडकेश्वर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती चौबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी पंकज कनोजे प्री-प्रायमरी पर्यवेक्षिका सुषमा नायडू आणि सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याध्यापिकांनी आपल्या भाषणात सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि असे सांगितले की शाळा महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहील. त्यांनी समर्पित प्रयत्न व संघभावनेचे महत्त्व विषद केले. त्यांनी कामगार दिनाचे महत्त्व सांगताना असे नमूद केले, की प्रत्येक कार्य, कितीही लहान असो, संस्थेच्या कार्यप्रवाहात महत्वाची भूमिका बजावते. एखाद्या व्यक्तीने काम बंद केल्यास संपूर्ण प्रणालीवर त्याचा परिणाम होतो. त्यांनी ग्राउंड स्टाफ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा मेहनतीने आणि निष्ठेने मनापासून कौतुक केले, व त्यांना शाळेचा आधारस्तंभ म्हणून गौरवले. हा कार्यक्रम एकता, प्रत्येक कार्याचे सन्मान उत्कृष्टतेकडे वाटचाल या सामूहिक संदेशाने संपन्न झाला.