
नागपूर ः दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या दुसऱ्या एशियन योगासन स्पर्धेत नागपूर येथील रमणा मारोती परिसरातील रतन नगर इथे राहणारी धनश्री लेकुरवाळे हिने सुवर्ण पदक पटकविले आहे. तिला मिळलेल्या या सुवर्ण यशामुळे ती २०२६ च्या जपान येथे होणाऱ्या एशियन गेम स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांचा आनंद द्विगुणीत झालेला आहे.
धनश्री ही मागील दहा वर्षांपासून योगासन स्पर्धेमध्ये भाग घेत असून ती विविध ठिकाणी योगाभ्यास सुद्धा शिकवत आहे. या प्रसंगी नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते राहुल अभंग, परमेश्वर राऊत, सौरभ काळमेघ, कपिल उमाळे आदी क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले.