
छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय ओपन सब जुनियर वूशु ट्रायल सिलेक्शन मध्ये शेख झोहेब याने रौप्य पदक पटकावले. शेख जोहेब यांनी आपली शानदार कामगिरी उंचावत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत पुणे येथील पवन पाटील याच्यासोबत त्याची फाइट झाली. यात शेख झोहेब याला पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. शेख जोहेब हा अल हिदाया पब्लिक शाळेच्या विद्यार्थी आहे आणि तो चौथी वर्गात शिक्षण घेत आहे.
रिया इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव (पुणे) येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर वुशु ओपन ट्रायल सिलेक्शन घेण्यात आल्या. या स्पर्धेत शेख जोहेब याने २८ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले. झोहेबच्या या शानदार कामगिरीबद्दल राज्याचे वुशू संघटनेचे सचिव सोपान कटके व जिल्हा वुशू संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे व सचिव महेश इंदापुरे व झेड एस वॉरियर अकॅडमीचे अध्यक्ष सय्यद जहूर अली व अल फराद वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सय्यद वाजेद अली व प्रशिक्षक सद्दाम मुसा, सैय्यद शेख रिजवान, बंटी राठोड, सुमित खरात यांनी अभिनंदन केले आहे.