
भुसावळ ः भुसावळ नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक तथा शॉट पीच क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ प्रदीप रवींद्र साखरे यांनी सामाजिक, पर्यावरण, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंतच्या केलेल्या कार्याबद्दल त्यांना जळगाव येथे खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रदीप साखरे यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर केलेले क्रीडा कार्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिएतनाम, थायलंड, चीन, मलेशिया, लावोस, इंडोनेशिया, मंगोलिया, नेपाळ अशा विविध देशांमध्ये एशियन गेम, बीच एशियन गेम, इंडोअर एशियन गेम, वर्ल्ड चॅम्पियनशिप अशा विविध स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व तसेच प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहे.
विविध कार्यांची दखल घेऊन सप्तरंग मराठी चॅनल व सूर्या फाउंडेशन यांच्या द्वारा व सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते अभिजीत खांडकेकर, आमदार अमोलदादा पाटील, आमदार राजुमामा भोळे, अॅड संजय राणे, किरण पातोंडेकर, डॉ मंदार पंडित, अर्चना सूर्यवंशी, सप्तरंग मराठी चॅनलचे पंकज कासार यांच्या हस्ते डॉ प्रदीप साखरे यांना खान्देश आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.