
बीड ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षांखालील मुलांच्या इन्व्हिटेशन लीग टूर्नामेंटमध्ये बीड संघाच्या शौर्य जाधव याने धमाकेदार शतक ठोकून सामना गाजवला.
पुणे या बीड आणि धाराशिव यांच्यात सामना झाला. या सामन्यात शौर्य जाधव याने १६२ चेंडूत २३ चौकारांच्या मदतीने १२६ धावांची खेळी केली आहे. शौर्याच्या या खेळीबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर, डॉ योगेश क्षीरसागर, सचिव आमेर सलीम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, शेख आरेफ, अतीक कुरेशी, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखूदे, सरफराज मोमीन, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख यांच्या वतीने अभिनंदन केले व संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.