
छत्रपती संभाजीनगर ः अल फरहाद वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटी संचलित झेड एस वॉरियर्स अकॅडमी आझाद चौक ब्रँचच्या वतीने राष्ट्रीय वुशू सब ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचे स्वागत करण्यात आले.
रिया इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर वुशू निवड चाचणी स्पर्धेत झेड एस वॉरियर्स अकॅडमी आझाद चौक ब्रँच मधील शेख हम्माद याचे २२ किलो वजन गटात आणि शेख जोहान याचे ३० किलो वजन गटात व सिल्कमिल कॉलनी ब्रांच मधून तय्यबा फातेमा हिचे ३९ किलो वजन गटात निवड झाली. ही स्पर्धा २६ ते ३१ मे दरम्यान तामिळनाडू येथे होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा वुशू असोसिएशनचे सचिव महेश इंदापुरे यांनी तीनही खेळाडूंचा सत्कार केला. या प्रसंगी अल फरहाद वेलफेअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शेख वाजेद अली, झेड एस वॉरियर्स अकॅडमीचे अध्यक्ष सय्यद जहूर अली व प्रशिक्षक सय्यद सद्दाम हे उपस्थित होते. याप्रसंगी अल फरहाद संस्थेची सहसचिव शेख फरहत समरीन व अजिंक्य नितनवरे, सलमान शेख, डॉ इरफान आणि शेख रिझवान यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.