
नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनतर्फे आयोजन
नाशिक ः नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे मोटू आणि पतलू होते. एनएएफ संस्थापक लीला राऊत व माधुरी कोतकर यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू स्नेहल राजपूत आणि पॅरा ऑलिम्पिकपटू पंकज आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नाशिक महानगरपालिका उपायुक्त करिष्मा नायर व स्पर्धेच्या समारोप सोहळा न्यू ग्रेस अकॅडमी व पावाचे चेअरमन राजेंद्र वानखेडे, पंचवटी पोलिस निरीक्षक मधुकर कड, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे चेअरमन रामदास मुखेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा भारतीचे महाराष्ट्र राज्य क्रीडा प्रमुख संजय पाटील, नाइन पर्लचे डॉ धनंजय डुबेरकर, फातिमा काचवाला, डॉ मनीषा रौंदाळ, प्रवीण कडाळे, प्रवीण साळवे यांची स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली.
या स्पर्धेत विविध गटातून नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनने उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली. त्यात शिवांग राठोड, आयरा यादव, जियान चौधरी, मायरा यादव, जियांश पाटील, रितू रणजीत, ओम कुंभार, उत्कर्षा भोवड, विराज सकट, तनुश्री गाडर, यश मुळीक, समीक्षा बोडके, ऋग्वेद आंबे, प्रिया मरागी या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत सांघिक विजेतेपद ट्रॅक अँड फिल्ड मास्टर ठाणे संघाने पटकावले. या संघाला दत्ता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अॅथलेटिक्स ग्रुप ऑफ पालघरच्या स्नेहल राजपूत यांना उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष डॉ मुस्तफा टोपीवाला, सहसचिव नलनी कड, मनोहर भावनाथ, हिरालाल लोथे, अमित जैन, माधुरी गडाख, प्रशांत शिंपी, राजेंद्र शिंदे, दत्ता शिंदे, शैला घुले, अश्विनी देवरे, राहुल पिंगळे, पूजा लबडे, दीपाली निकम, प्रांजल पाटोळे, ऐश्वर्या भोर, नवीन गायकवाड, शुभम धनधान, अविनाश गायकवाड, राहुल नवले, साहिल गांगुर्डे, गौरव लोणारे, मोना सिंग, जय तांबे या सर्वांच्या योगदानामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली, अशी माहिती सचिव मंगेश राऊत यांनी दिली.