
छत्रपती संभाजीनगर ः मलकापूर (जि. बुलढाणा) येथे पार पडलेल्या सब ज्युनिअर महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर मुलांच्या संघाने सुवर्णपदक पटकावले तसेच मुलींच्या संघाने रौप्यपदक पटकावले.
तसेच वैयक्तिक एकेरी मध्ये मुलांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या आदीब शेख याने सुवर्णपदक आणि आर्यन हारदे याने रौप्यपदक पटकावले. मुलींमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या अमीका शेट्टी हिला कांस्य पदक मिळाले.
ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवण्यात आली. त्यामुळे खेळाडूंना अनेक सामने खेळायला मिळाले. या स्पर्धेचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक निलेश हारदे यांनी काम पाहिले.
या सर्व खेळाडूंना घवघवीत यशाबद्दल अंकुशराव कदम, गोकुळ तांदळे, सचिव निलेश हारदे, मुख्याध्यापक आदित्य जोशी, अनिता हिवराळे, डॉ समीना पठाण आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
सुवर्णपदक विजेता मुलांचा संघ
आर्यन हारदे, आदीब शेख, कार्तिके भाले, कार्तिक भावसार, प्रत्युष बागुल, अनय जोशी, रिशीत हिवराळे, ओम बावस्कर.
रौप्यपदक विजेता मुलींचा संघ
आमिका शेट्टी, मोक्षा जैन, आर्या देशमुख, अनुष्का हिवराळे.