
अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू फिजा सय्यद हिला जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त अहिल्यानगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन २०१९-२० या वर्षीचा जिल्हा क्रीडा पुरस्कार फिजा फत्तू सय्यद हिला घोषित केला आहे. त्याचे वितरण जिल्हा पोलीस ग्राउंडवर करण्यात आले. फिजा सय्यद ही सॉफ्टबॉल खेळाडू असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिच्या कार्याचा गौरव म्हणून फिजाला हा पुरस्कार प्राप्त झाला असून तिचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.