रोलर रिले स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत १५० खेळाडूंचा सहभाग

  • By admin
  • May 4, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः ४३ व्या खुल्या रोलर रिले स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पुणे, जळगाव, नंदुरबार, धुळे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक, जालना, अहिल्यानगर, नागपूर, ठाणे, मुंबई तसेच छत्रपती संभाजीनगर येथील तब्बल १५० स्केटर्सनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर, मिस्टर आशिया, मिस्टर वर्ल्ड, अभिनेता, छत्रपती पुरस्कार प्राप्त सिद्धांत मोरे व रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव भिकन अंबे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष किशोर जाधव, तसेच रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राहुल श्रीरामवार, राधिका अंबे, संगीता भट्टड, पूजा अंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेसाठी टेक्निकल ऑफिसियल्स आणि आरआरएसएफआय मान्यताप्राप्त प्रशिक्षक म्हणून तेजस पाटील (कोल्हापूर), पियुष दाभाडे (जळगाव), दीपक चौहान (पुणे), विशाल मोरे (जळगाव), ठाकरे (नंदुरबार), सचिन आहिरे (नाशिक), सूरज शिंदे (सांगली), राठोड (नाशिक), शंतनू रेणापूरकर (नांदेड), फहीम खान (जालना), अनंत सोनवणे (जळगाव), स्वाती किनेकर (सांगली), साई अंबे (छत्रपती संभाजीनगर), गणेश बनसोडे (छत्रपती संभाजीनगर) यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू

ध्रुव जैस्वाल (छत्रपती संभाजीनगर), आर्यन बरीथया (सांगली), अगम्य लागला (छत्रपती संभाजीनगर), अथर्व थिगळे (छत्रपती संभाजीनगर), ⁠अक्षत खामकर (कोल्हापूर), ⁠श्लोक कोळी (कोल्हापूर), ओवी वाघ (छत्रपती संभाजीनगर), अनोखी उफाडे (पुणे), अधिराज खरात (कोल्हापूर), ⁠आरुष कोरडे (सांगली), स्पृहा कुलकर्णी (पुणे), ⁠स्वरा किणीकर (कोल्हापूर), ⁠साची देशमुख (छत्रपती संभाजीनगर), नचिकेत जैस्वाल (छत्रपती संभाजीनगर), ⁠अर्जुन शहा (नंदुरबार), ⁠रायान शेख (छत्रपती संभाजीनगर), निवेदिता शिंदे (कोल्हापूर), इशिका साबळे (छत्रपती संभाजीनगर), ऋग्वेद टिंगरे (पुणे), ⁠यश साबळे (छत्रपती संभाजीनगर), आरूष चव्हाण (छत्रपती संभाजीनगर), चैतन्य मालगुंडे (पुणे), अनुज चव्हाण, शिवम कुंभार (सांगली), ⁠ध्रुव काकडे (नंदुरबार), आश्णी मल्होत्रा (पुणे), बुऱहानुद्दिन मोईजेसी (जळगाव), रियांश नागरगोजे (नांदेड), ⁠कियांश जाधव (नांदेड), श्रावणी अवगडे (भुसावळ), माही तोष्णीवाल (नंदुरबार), ⁠मिष्टी तोष्णीवाल (नंदुरबार), कृष्णा खडसे (भुसावळ), शिरीष चौधरी (सांगली), शौर्य तावडे (भुसावळ), जैनिक शहा (सांगली), प्रणित सूर्यवंशी (धुळे), चिन्मय सोमवंशी (जळगाव), यश पाटील (भुसावळ), ⁠अवधूत थत्तेकर (छत्रपती संभाजीनगर), पियूष कंचुर (कोल्हापूर), आरोही महारणूर (सांगली), ⁠सानवी सोनवणे (भुसावळ), मोक्षदा बंडले (जळगाव), प्रथमेश चौधरी (धुळे), ⁠इंभय चौधरी (जळगाव), हिमांशू बोरसे (जळगाव), इशिका सपकाळ (जळगाव), दिव्या हंकर (छत्रपती संभाजीनगर), तनय कोळपे, ⁠श्रेयस मार्तंड, ⁠हर्षल सवकर, कुणाल पाटील (जळगाव), आरव नायर (छत्रपती संभाजीनगर), ⁠अवियान देशमुख (छत्रपती संभाजीनगर), ⁠भार्गव कुलकर्णी (जालना), रुही शेख (छत्रपती संभाजीनगर), अद्वित पाटील (छत्रपती संभाजीनगर), विराज शेवाळे (छत्रपती संभाजीनगर), समर्थ इंगळे (छत्रपती संभाजीनगर), मारियम शेख (छत्रपती संभाजीनगर), ⁠नायरा रदासणी (जळगाव), प्रणम्य चौधरी (छत्रपती संभाजीनगर), ⁠आदित्य पाटील (कोल्हापूर), ⁠नील भंडारी (सांगली), इराम शेख (छत्रपती संभाजीनगर), ⁠नियती पिंटो (पुणे), ⁠दिव्या देशमुख (छत्रपती संभाजीनगर), ईश्वरी चौधरी (छत्रपती संभाजीनगर), ⁠श्रेया म्हस्के (छत्रपती संभाजीनगर), कृष्णा लोहिया (नागपूर), ऋग्वेद टिंगरे (पुणे), तेजस सोनाळकर (छत्रपती संभाजीनगर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *