सिबिईयु वॉरीयर्सची आगेकूच एमडीसीने रोखली

  • By admin
  • May 4, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

अडसूळ ट्रस्ट शालेय कॅरम स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने एलआयसी प्रायोजित आणि अडसूळ ट्रस्ट, सिबिईयु व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेत काल उत्कंठावर्धक सामने रंगले. या स्पर्धेतील सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे अपराजित वाटचाल सुरू ठेवणाऱ्या सिबिईयु वॉरीयर्सचा पल्ला एमडीसी ज्वेलर्सने अचूक खेळीने रोखले.

प्रसाद मानेने सुरुवातीला सिबिईयुला २५-५ असा दमदार विजय मिळवून दिला होता. पण त्यानंतर वेदिका पोमेंडकरने सारा देवनला १०-६ ने आणि सार्थक केरकरने उमैर पठाणला १४-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत करत एमडीसी ज्वेलर्सला २-१ असा निर्णायक विजय मिळवून दिला. या विजयामुळे एमडीसीने आपला तिसरा गुण मिळवत स्पर्धेतील रंगत वाढवली.

श्रीशानचा विजय
दुसऱ्या सामन्यात आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि गोविंदराव मोहिते फायटर्स यांच्यात चुरशीचा सामना रंगला. पुष्कर गोळेने शिवांश मोरेला १८-१० ने पराभूत करून फायटर्स संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र मयुरेश पवारने नील म्हात्रेला १७-११ ने नमवले आणि सामना १-१ ने बरोबरीत आला. निर्णायक लढतीत श्रीशान पालवणकरने आक्रमक आणि अचूक फटकेबाजी करत मंदार पालकरला २५-२ ने हरवले व प्रतिष्ठान संघाला विजय मिळवून दिला.

तनया दळवी ठरली आघाडीची खेळाडू
सुरेश आचरेकर फिनिशर्स संघाच्या विजयात तनया दळवी आणि आर्यन राऊत यांनी निर्णायक भूमिका बजावली. तनयाने सोहम जाधवला २५-० ने तर आर्यनने वेदांत पाटणकरला २१-५ ने हरवत अविनाश स्पोर्ट्सवर २-१ असा विजय मिळवून दिला. ग्रीष्मा धामणकरने एकमेव विजय मिळवून संघाला थोडा दिलासा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *