पीसीए९९ ब संघाचा दणदणीत विजय

  • By admin
  • May 4, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट ः कार्तिक भारद्वाज सामनावीर, रणवीर लोंढेची धमाकेदार फलंदाजी

छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत पीसीए९९ ब संघाने वायएल क्रिकेट अकादमी संघाचा पाच विकेट राखून मोठा पराभव केला. या सामन्यात ३१ धावांत पाच विकेट घेणारा कार्तिक भारद्वाज हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

प्रोफेशनल क्रिकेट अकादमी९९चे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी या स्पर्धेचे आयोजन पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर केले आहे. वायएल क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५.२ सर्वबाद १४५ धावसंख्या उभारली. पीसीए९९ ब संघाने २०.१ षटकात पाच बाद १४६ धावा फटकावत पाच विकेट राखून सामना जिंकला व आगेकूच केली.

या सामन्यात रणवीर लोंढे याने अवघ्या ३९ चेंडूत ९० धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. त्याचे शतक अवघ्या १० धावांनी हुकले. रणवीरने आपल्या वादळी खेळीत सहा उत्तुंग षटकार व अकरा चौकार मारले. कार्तिक अटोळे याने ४२ चेंडूत ४६ धावांची वेगवान खेळी केली. त्याने दहा चौकार ठोकले. राम काळमेघ याने ४५ चेंडूत ४२ धावांची दमदार खेळी साकारली. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला.

गोलंदाजीत कार्तिक भारद्वाज याने आपली चमक दाखवली. कार्तिक याने ३१ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. कुणाल याने ७ धावांत दोन तर प्रज्वल तिलकरी याने १४ धावांत दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

वायएल क्रिकेट अकादमी ः १५.२ षटकात सर्वबाद १४५ (अर्णव वाघोले ५, जेनी ७, कुणाल ५, रणवीर लोंढे ९०, इतर ३४, कार्तिक भारद्वाज ५-३१, प्रज्वल तिलकरी २-१४, ज्योतिरादित्य राजगुरू १-४०, अविनाश देसाई १-१८, विकी भोसले १-४) पराभूत विरुद्ध पीसीए९९ ब संघ ः २०.१ षटकात पाच बाद १४६ (विकी भोसले ५, कार्तिक देसाई ४६, राम काळमेघ नाबाद ४२, प्रतीक कदम १४, विश्वजीत शिंदे नाबाद ५, इतर ३३, कुणाल २-७, जिने २-४०, विहान पाटील १-१४). सामनावीर ः कार्तिक भारद्वाज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *