
नंदुरबार ः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दोन प्रतिभावान खेळाडूंची जागतिक विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा जर्मनी येथे आयोजित करण्यात आली असून त्यासाठी ओडिशा भुवनेश्वर येथे आयोजित निवड चाचणीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

नंदुरबार जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे खेळाडू रिंकी पावरा (२१ किलो मीटर धावणे) आणि आरती पावरा (हाफ मॅरेथॉन) या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या प्रकारांत उत्कृष्ट कौशल्य दाखवत स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण विद्यापीठात आनंदाचे वातावरण आहे.
या स्पर्धेची निवड चाचणी २८ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान केआयआयटी भुवनेश्वर, ओडिशा येथे पार पडली. खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचे महाविद्यालय, विद्यापीठ क्रीडा संचालक, प्रशिक्षक, तसेच कुटुंबियांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यापीठाच्या वतीने त्यांना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, ही निवड विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे. दोघांच्या निवडीबद्दल जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आ चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष प्रा दिलीप जानराव सचिव डॉ मयुर ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.