केकेआर संघाचा रोमहर्षक विजय 

  • By admin
  • May 4, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

रियान परागचे सहा चेंडूत सहा षटकार व्यर्थ, राजस्थान रॉयल्स अवघ्या १ धावेने पराभूत 

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स संघाने एका रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १ धावेने पराभव केला. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत २०६ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात राजस्थानला निर्धारित २० षटकांत फक्त २०५ धावा करता आल्या. या सामन्यात रियान परागने ९५ धावांची खेळी केली, परंतु तो त्याच्या संघाचा विजय निश्चित करू शकला नाही. या विजयासह केकेआर संघाने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

राजस्थान रॉयल्सना २०७ धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून संघाची सुरुवात खूपच खराब झाली. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने फक्त ४ धावा केल्या आणि आयपीएलमध्ये पदार्पण करणारा कुणाल सिंग राठोड त्याच्या पहिल्या सामन्यात खातेही उघडू शकला नाही. राजस्थानने ८ धावांवर २ विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जयस्वालला सुरुवात नक्कीच चांगली मिळाली पण २१ चेंडूत ३४ धावा करून तो बाद झाला.

ध्रुव जुरेल आणि वानिंदू हसरंगा यांनाही फलंदाजीत काही खास कामगिरी करता आली नाही आणि अर्धा संघ ७१ धावांवर बाद झाला. पण रियान परागने एका टोकाला धरून ४९ चेंडूत १०७ धावांची शतकी खेळी केली. त्याने शिमरॉन हेटमायरसोबत ९२ धावांची भागीदारी करून राजस्थानला सामन्यात पुनरागमन करण्यास मदत केली. २३ चेंडूत २९ धावा करून हेटमायर बाद झाला.

रियान परागची मेहनत वाया गेली
या सामन्यात रियान परागने २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि या दरम्यान त्याने हेटमायरसोबत एका षटकात ३२ धावा केल्या. त्याने सामन्यात ४५ चेंडूत ९५ धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने ६ चौकार आणि ८ षटकार मारले. आरआरचा विजय जवळजवळ निश्चित वाटत होता, पण १८ व्या षटकात हर्षित राणाने त्यांना ९५ धावांवर बाद केले आणि केकेआरला सामन्यात परत आणले.

शेवटच्या २ षटकांत ३३ धावांची आवश्यकता होती
राजस्थान रॉयल्सला शेवटच्या २ षटकांत विजयासाठी ३३ धावांची आवश्यकता होती आणि रियान पराग बाद झाल्यानंतर राजस्थानच्या अडचणी वाढू लागल्या. आंद्रे रसेलने १९ व्या षटकात ११ धावा दिल्या आणि आरआरसमोर शेवटच्या ६ चेंडूत २२ धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानला जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर ३ धावा करायच्या होत्या, पण राजस्थानला फक्त एक धाव करता आली.


असे सहा षटकार मारले

१३ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या फिरकी गोलंदाज मोईन अलीला रियानने लक्ष्य केले. मोईनच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शिमरॉन हेटमायरने धाव घेतली आणि स्ट्राईक रायनला आला. रियानने सलग चार चेंडूंवर षटकार मारले आणि पाचवा चेंडू वाइड झाला. मोईनच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रियान याने षटकार मारला. यानंतर, वरुण चक्रवर्ती १४ वे षटक टाकण्यासाठी आला आणि हेटमायरने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतली. मग स्ट्राईक रियानकडे होता आणि त्याने वरुणच्या चेंडूवर षटकार मारला. अशाप्रकारे रियान परागने सलग सहा चेंडूवर सहा षटकार मारले.

रियान पराग या खास यादीत सामील झाला आहे
त्याच्या दमदार फलंदाजीमुळे रायन या खास यादीत सामील झाला आहे. आयपीएलच्या एका षटकात सलग पाच षटकार मारणारा रियान पाचवा फलंदाज ठरला. रायनच्या आधी ख्रिस गेल, राहुल तेवतिया, रवींद्र जडेजा आणि रिंकू सिंग यांनी हे केले आहे. मोईन अलीचे षटक केकेआरसाठी खूप महागडा ठरले. कारण राजस्थानने त्यातून ३२ धावा काढल्या.

केकेआर चार बाद २०६

 केकेआर संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात चार बाद २०६ धावसंख्या उभारली. त्यात आंद्रे रसेल याने नाबाद ५७ धावांची स्फोटक खेळी केली. रसेल याने २५ चेंडूत सहा टोलेजंग षटकार व चार चौकार मारले. रिंकू सिंग याने ६ चेंडूत नाबाद १९ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व एक चौकार मारला. रघुवंशी (४४), अजिंक्य रहाणे (३०), गुरबाज (३५) यांनी शानदार योगदान दिले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *