
मलकापूर ः मलकापूर येथे आयोजित राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत मुलींच्या गटात बुलढाणा आणि मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर संघ विजेते ठरले.
महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर सॉफ्ट टेनिस प्रीमियर लीग स्पर्धा तालुका क्रीडा संकुल येथे थाटात संपन्न झाली. स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर व सॉफ्ट टेनिस असोसिएशन बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध १५ जिल्हा संघ व नामांकित १०५ खेळाडूंनी सहभाग घेतला. प्रथमच होणाऱ्या स्पर्धेत नागपूर, चंद्रापूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, सोलापूर, धाराशिव, धुळे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वाशीम व यजमान बुलढाणा या संघांनी विजेतेपदासाठी झुंज दिली.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसांसह स्मृतिचिन्ह व पदक वितरित करण्यात आले. या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून जनक्रांती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कोमल ताई तायडे, हभप महंत नितीन महाराज अहिर, आर पी एफ ठाणेदार मलकापूर जसबीरसिंग राणा, उर्मिलाताई जाधव, स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष डॉ नितीन भुजबळ, सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक आरडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक निलेश हरदे, सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय पळसकर, आयोजन समितीचे सचिव राजेश्वर खंगार आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी टूर्नामेंट डायरेक्ट म्हणून छत्रपती संभाजीनगरचे निलेश हारदे यांनी काम पाहिले तर तांत्रिक समितीचे राम हबर्डे (सांगली), नितीन पोटे (अमरावती), परेश देशमुख (नागपूर) यांनी तर पंच म्हणून राजदीप मनवर, अमोल तायडे, विवेक जाधव, शिरिष खराडे, अभिषेक मानकर आदींनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धा आयोजनासाठी अमोल तायडे, संदीप क्षीरसागर, गणेश खर्चे, गजानन जोगदंड संदीप तिवने, दिलीप तांदुळे, स्वप्नील साळुंके, गुरू यादव, सुधाकर पाटील, पंकज जगताप, चंद्रशेखर तायडे, योगेश पाटील आदींची योगदान राहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
वैयक्तिक प्रकार मुले ः १. मो. आबिद (छत्रपती संभाजीनगर), २. आर्यन हारदे (छत्रपती संभाजीनगर), ३. स्पर्श तायडे (बुलढाणा) व अर्णव सातपुते. मुली ः १. भक्ती क्षीरसागर (बुलढाणा), २. विपश्यना सोनवने (सोलापूर), ३. अमिका शेट्टी (छत्रपती संभाजीनगर) व पलक परदेशी (बुलढाणा).
सांघिक प्रकार मुले ः १. छत्रपती संभाजीनगर, २. बुलढाणा, ३. नागपूर. मुली ः १. बुलढाणा, २. छत्रपती संभाजीनगर, ३. सोलापूर.
कोट
सॉफ्ट टेनिस खेळ वाढावण्यासाठी आणि या खेळामध्ये दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीनेच या स्पर्धेचे आयोजन केले होते. आगामी काळात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत असे आयोजन नियमित होत रहावे.
- विजय पळसकर, सचिव, सॉफ्ट टेनिस असोसिएशन बुलढाणा