
जळगाव ः महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संघटनाचा महासंघ, जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक व शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील शिवछपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा एका शानदार सोहळ्यात गौरव करण्यात आला.
या गौरव समारंभाचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च मानाचा पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी जयेश मोरे (सॉफ्टबॉल), नेहा नितीन देशमुख (सॉफ्टबॉल), अभिजित दत्तात्रय त्रिपणकर (कॅरम), संदीप अशोक दिवे (कॅरम), नीलम भिमराव घोडके (कॅरम), प्रीतिश रमेश पाटील (सॉफ्टबॉल), रेखा पूना धनगर (बेसबॉल), योगेश अशोक ढोंगळे (कॅरम) तर डॉ शरयु विसपुते (एशियन योग क्रीडा स्पर्धा) यांचा गौरव चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

तसेच जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात पीएच डी प्राप्त क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यात डॉ श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ देवदत्त पाटील, डॉ संजय चौधरी, डॉ रणजित पाटील, डॉ नीलिमा पाटील, डॉ वर्षा खडसे, डॉ उमेश पाटील, डॉ महेश पाटील, डॉ अनिता कोल्हे, डॉ सचिन पाटील, डॉ पी आर चौधरी, डॉ अमोल पाटील, डॉ विजय पाटील, डॉ संतोष बडगुजर, डॉ प्रतिभा ढाके, डॉ जी एम मारतळे, डॉ आनंद उपाध्ये, डॉ मुकेश पवार, डॉ चांद खान, डॉ नवनीत अली, डॉ सुमेध तळवेलकर, डॉ जय जाधव, डॉ दिनेश पाटील, डॉ सचिव भोसले, डॉ विलास नारखेडे, डॉ आसिफ खान, डॉ अनिल पाटील, डॉ साखरे यांचा गौरव चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील युवा पुरस्कार प्राप्त जिनल जैन, मोनाली कुमावत, गोपाल दर्जी, तेजस पाटील, नरेंद्र पाटील, अनिल बाविस्कर, शुभांगी फासे, अविनाश जावळे, सागर कोळी व विलास नारखेडे यांचा गौरव चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे खासदार सुमित्रा वाघ, शहराचे आमदार राजूमामा भोळे, चोपडा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष श्याम कोगटा, शिवछत्रपती पुरस्कारार्थी नारायण अप्पा खडसे, एजाज मलिक, प्रदीप तळवेलकर, सतीश मदाणे, जनता बॅकेचे मॅनेजर, रोहन बाहिती, सचिव क्रीडा रसिक क्लबचे, योगेश मांडे, क्रीडा भारती, जळगाव, अजय देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ललित कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप तळवेलकर यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंत जाधव, अरुण श्रीखंडे, विनोद माने, विनोद कुलकर्णी व अविनाश महाजन आदींनी पुढाकार घेतला.