छत्रपती संभाजीनगर संघाचा हिंगोलीवर डावाने विजय 

  • By admin
  • May 5, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

राघव नाईक, मोहम्मद अली, वेदांत काटकर, मयंक कदमची लक्षवेधक कामगिरी

छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १६ निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने हिंगोली संघावर एक डाव आणि २६ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात मोहम्मद अली याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रामपूर येथील पाटील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने प्रथम फलंदाजी करत ५८.१ षटकात नऊ बाद ३०७ अशी भक्कम धावसंख्या उभारून डाव घोषित केला. त्यानंतर हिंगोली संघाचा पहिला डाव ४४.१ षटकात १५४ धावसंख्येवर गुंडाळला. हिंगोली संघाला फॉलोऑन दिला. हिंगोली संघाचा दुसरा डाव ४४.२ षटकात अवघ्या १२८ धावांत सर्वबाद झाला. गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर छत्रपती संभाजीनगर संघाने हिंगोली संघाचा एक डाव आणि २६ धावांनी पराभव केला. 

या सामन्यात राघव नाईक याने १०६ चेंडूंत ७५ धावांची शानदार खेळी साकारली. राघवने १२ चौकार व दोन षटकार मारले. कृष्णा घुगे याने १२० चेंडूंचा सामना करत ७१ धावांची संयमी खेळी केली. त्याने १२ चौकार मारले. मोहम्मद अली याने ६५ चेंडूत ७० धावांची जलद खेळी केली. अली याने पाच चौकार व पाच उत्तुंग षटकार मारले. गोलंदाजीत वेदांत काटकर याने शानदार कामगिरी केली. वेदांत याने ९३ धावांत सात विकेट घेतल्या. मयंक कदम याने २७  धावांत चार गडी बाद केले. अभिराम गोसावी याने एक धाव देऊन तीन बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक

छत्रपती संभाजीनगर ः ५८.१ षटकात नऊ बाद ३०७ डाव घोषित (राघव नाईक ७५, आदित्य शिंदे ३२, श्लोक गिरगे १९, सोहम नरवडे ४३, मोहम्मद अली ७०, इतर ४२, वेदांत काटकर ७-९३, फुजेल पठाण १-५०, सोफियान पाटील १-२७).

हिंगोली ः पहिला डाव ः ४४.१ षटकात सर्वबाद १५४ (कृष्णा घुगे २७, सोहम सरगर ३२, शौनक पंजाबी ९, आरव अंबुलगेकर २१, फुजेल पठाण ३८, इतर १७, मयंक कदम ४-२७, मोहम्मद अली ३-२५, ध्रुव पुंड २-४, श्रीवेद राजळे १-४१).

हिंगोली ः दुसरा डाव ः ४४.२ षटकात सर्वबाद १२७ (कृष्णा घुगे ७१, आरव अंबुलगेकर १२, वेदांत गावडे २३, इतर १५, अभिराम गोसावी ३-१, अर्श कुरेशी ३-१८, मुफद्दल ताहेर तक्साली ३-१८, मयंक कदम १-४१).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *