विज्ञान शाखा ९७.४८ टक्के, वाणिज्य शाखा ९८.९६ टक्के, कला शाखा ८८.९५ टक्के निकाल
छत्रपती संभाजीनगर : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत देवगिरी महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.
देवगिरी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९७.४८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९८.९६ टक्के, कला शाखेचा निकाल ८८.९५ टक्के तर व्होकेशनल शाखेचा निकाल १००.०० टक्के लागला आहे. महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान व व्होकेशनल शाखेतील ८५५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
वाणिज्य शाखेत स्वानंदी आतिश भाले या विद्यार्थिनीने ९६.६७ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. संतांसे अनुश्री अविनाश संतांसे हिने ९६.०० टक्के गुण घेऊन द्वितीय आणि वेधिका दिनेश लोणे हिने ९५.६७ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. १११ विद्यार्थ्यांनी ९०.०० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
कला शाखेत सुदर्शन साईनाथ जाधव ९५.८३ टक्के प्रथम, आव्हाळे वैष्णवी तातेराव आव्हाळे ९४.५० टक्के व संध्या देविदास पवार ९४.५० टक्के द्वितीय, राधिका अजय गवळीकर ९४.०० टक्के आले असून २१ विद्यार्थ्यांनी ८५.०० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
विज्ञान शाखेत सिद्धी राधाकृष्ण कारले ८८.८३ टक्के व ईश्वरी मनोज मरकंदे ८८.८३ टक्के प्रथम, अर्णव तानाजी देशमुख ८८.६७ टक्के द्वितीय, मृदुला देवेंद्र मुळे ८८.५० टक्के तृतीय आले असून २८ विद्यार्थ्यांनी ८५.०० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
व्होकेशनल शाखेत वल्लभ मनोज कवटकर ८४.८३ टक्के प्रथम, कुशवंतसिंग राम गादिया ८१.५० टक्के द्वितीय, सम्यक रामदास वाघ ८१.३३ टक्के तृतीय गुण मिळवले आहेत.
महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील १४ विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त कले आहे. १५ विद्यार्थ्यांनी पाली विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे अण्णा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा नंदकिशोर गायकवाड, कला व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने व व्होकेशनल विभागाचे उपप्राचार्य प्रा विजय नलावडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.