
सीएसआर इंटरनॅशनल स्कूल आणि सीएसआर टेनिस अकादमीतर्फे आयोजन, विजेत्यांना पाच लाखांची पारितोषिके
छत्रपती संभाजीनगर ः सीएसआर इंटरनॅशनल स्कूल आणि सीएसआर टेनिस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाच लाख पारितोषिक रक्कमेच्या विभागीय लॉन टेनिस लीग स्पर्धेत युवान पमनानी, ह्रदयिनी त्रिभुवन, दोहाड कसाळे, अधीरा सोमवंशी, शिवराज जाधव, वृंदिका राजपूत, विहान हंबर्डे, पलाश जैन, सांची खिल्लारे, आराध्या कोठारी, तन्मय वैद्य, अथर्व वडगिरे, लुंबिनी कांबळे, पियुष गायकवाड, अर्जुन अग्रवाल या खेळाडूंनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावत स्पर्धा गाजवली.
सीएसआर इंटरनॅशनल स्कूल आणि सीएसआर टेनिस अकादमीने विद्यार्थ्यांसाठी २० सामने आणि ५ लक्ष रुपये बक्षीस रक्कम असलेली विभागीय स्तरावरील लॉन टेनिस लीग स्पर्धा आयोजित केली होती. सीएसआर इंटरनॅशनल स्कूल आणि सीएसआर टेनिस अकादमीने १० ते १६ वयोगटातील मुला-मुलींसाठी एक स्पर्धात्मक विभागीय स्तरावरील लॉन टेनिस स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली. सीएसआर अकादमीच्या टेनिस कोर्टवर ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मराठवाडा विभागातील युवा प्रतिभावंत लॉन टेनिसपटूंनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
ही स्पर्धा विविध वयोगटात घेण्यात आली. १० वर्षांखालील, १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र ड्रॉसह ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नांदेड, परभणी, बीड, खामगाव, जळगाव, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील २०० हून अधिक सहभागींनी, प्रशिक्षक, पालक आणि स्थानिक क्रीडा अधिकाऱ्यांसह उत्साहवर्धक प्रेक्षकांसमोर आपले कौशल्य आणि क्रीडा कौशल्य दाखवले.
या स्पर्धेचे महत्त्व असे होते
ही स्पर्धा लीगच्या स्वरूपात खेळवण्यात आली. या स्पर्धेत स्पर्धकाला प्रत्येक सामन्याचे पॉइंट देण्यात आले आणि २० सामन्यांत सर्वात जास्त पॉइंट घेणारे स्पर्धक विनर म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये १० वर्षांखालील, १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील तसेच मेन्स ओपन आणि मेन्स वेट रन्स या सर्वांच्या २० स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे विविध कॅटेगिरीत ५ लक्ष रुपये बक्षीस देण्यात आले.
या प्रसंगी सीएसआर इंटरनॅशनल स्कूल आणि सीएसआर अकादमीचे संचालक गजेंद्र भोसले म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरचे पहिले ३ सिंथेटिक कोर्ट सीएसआर अकॅडमीतर्फे ओपन करण्यात आले आहे. युवा प्रतिभेची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांना जोपासण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. भविष्यातील टेनिस स्टार चमकू शकतील असे व्यासपीठ प्रदान करण्याचा आम्हाला अभिमान आहे.
सीएसआर स्कूल नेहमीच वर्षभर विविध स्पर्धांसाठी व्यासपीठ प्रदान करते. प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना आणि उपविजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्रे देण्यात आली. या सामन्यांनी खेळाडूंच्या स्पर्धात्मक भावनेवर प्रकाश टाकला नाही तर युवा खेळांडूमध्ये शिस्त, तंदुरुस्ती आणि खिलाडूवृत्तीचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
सीएसआर टेनिस अकादमी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्पर्धात्मक संधींद्वारे तळागाळातील टेनिसला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिभेला जोपासण्यासाठी आपली वचनबद्धता सुरू ठेवते.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१० वयोगट मुले एकेरी ः १. युवान पमनानी (अहिल्यानगर), २. अविरत पाटील. मुलींचा गट ः १. हृदयिनी त्रिभुवन, २. शिवन्या परदेशी.
१२ वर्षांखालील मुले ः १. दोहाड कसाळे, २. पलाश जैन. मुलींचा गट ः १. अधीरा सोमवंशी, सांची खिल्लारे.
१४ वर्षांखालील मुले : १. दोहाड कसाळे, २. शौर्य पाटील. मुलींचा गट ः १. अधीरा सोमवंशी, मनस्वी राठोड.
१६ वर्षांखालील मुले : १. शिवराज जाधव, २. अर्जुन अग्रवाल. मुलींचा गट ः १. वृंदिका राजपूत, २. अक्षरी मंडलिक.
१२ वर्षांखालील दुहेरी गट मुले ः १. विवान हंबर्डे-पलाश जैन, २. लक्ष जैन- क्षितिज आडगावकर. मुलींचा गट ः १. सांची खिल्लारे-आराध्या कोठारी, २. अधीरा सोमवंशी-शिवन्या परदेशी.
१४ वर्षांखालील दुहेरी गट मुले ः १. तन्मय वैद्य-अथर्व वडगिरे, २. दिग्विजय देशमुख-स्वराज पाटील. मुलींचा गट ः १. लुंबिनी कांबळे-अधीरा सोमवंशी, २. मनस्वी राठोड-
श्रीनिधी.
१६ वर्षांखालील दुहेरी गट मुले : १. पियुष गायकवाड-अर्जुन अग्रवाल, २. आदित्य चव्हाण-बाळकृष्ण वर्मा.