
नागपूर ः यवतमाळ संघाने वर्धा-भंडारा संघाचा चार विकेट्सने पराभव करून व्हीसीए आंतरजिल्हा टी २० करंडक स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
अमरावती येथील एचव्हीपीएम स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या उच्च धावसंख्येच्या अंतिम सामन्यात वर्धा-भंडारा संघाने कर्णधार यश कदमच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १९५ धावा केल्या.
सहाव्या षटकात ४५/२ अशा धावसंख्येवर मैदानात उतरणाऱ्या यश कदम याने ४३ चेंडूंचा सामना केला आणि सहा चौकार आणि तेवढेच षटकार मारून संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. यवतमाळ संघाकडून कर्णधार अक्षय कर्णेवारने २३ धावांत चार विकेट्स घेतल्या.
यवतमाळ संघाचा सलामीवीर गंधार घावडे (०) अवघ्या एका धावेवर बाद झाला, परंतु सहा विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्यात त्यांना यश आले. वेदांत दिघाडे (३८), जगजोत सासन (४९) आणि पुष्पक गुजर (२९) यांनी उपयुक्त योगदान दिले, पण सातव्या विकेटसाठी तेजस सोनी (नाबाद १४) आणि रोहितदास लखुले (नाबाद १९) यांनी शानदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
वर्धा-भंडारा २० षटकांत पाच बाद १९५ (यश कदम नाबाद ८८, अक्षय कर्णेवार ४-२३).
यवतमाळ १९.४ षटकांत सहा बाद १९९ (वेदांत दिघडे ३८, जगज्योत सासन ४९, पुष्पक गुजर २९, सौरभ दुबे २-३०, पार्थ खुरे २-४१).