
जळगाव ः महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सब ज्युनियर १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या स्पर्धा होत असून त्यासाठी जळगाव जिल्ह्याचा फुटबॉल संघाची निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे ७ मे रोजी सकाळी सात वाजता करण्यात आले आहे.
या निवड चाचणीत जन्मतारीख जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ च्या नंतर असेल तेच खेळाडू या चाचणीसाठी पात्र आहेत. प्रत्येक खेळाडूला सीआरएस करणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणीला हजर रहावे असे आवाहन जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे व सचिव फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.