छत्रपती संभाजीनगर प्रीमियर लीग टी २० स्पर्धा बुधवारपासून रंगणार

  • By admin
  • May 6, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर आयोजन, दहा संघांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर टी २० प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार बुधवारपासून (७ मे) रंगणार आहे. या स्पर्धेत दहा संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस असणार आहे, अशी माहिती संयोजक राहुल पाटील व संदीप जाधव यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गरवारे क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे. या स्पर्धेत सान्या मोटर्स (संघ मालक मिहीर मुळे), एसएनआयसी (विशाल गिते), ओंकार रोडवेज (सदाशिव कदम), एस आर व्हेंचर्स (माधुरी व सिमा), रजनी क्रिकेट अकादमी (रजनी कचरे), छत्रपती फायटर्स (गोपाल पवार), एम ई वॉरियर्स (इशांत राय), पटेल हॉस्पिटल पाचोड (इरफान शेख), युवराज क्रिकेट अकादमी (प्रमोद उघडे), रोहन क्रिकेट क्लब (विकास निरफळ) या संघांचा सहभाग आहे. या संघात विजेतेपदासाठी बुधवारपासून चुरशीचे सामने पहावयास मिळणार आहेत.

या स्पर्धेसाठी आयपीएलच्या धर्तीवर खेळाडूंवर बोली लावण्यात आली. लिलावाद्वारे संघ मालकांनी खेळाडूंना आपल्या संघात विकत घेतले. पॉइंट पद्धत वापरण्यात आली. या स्पर्धेसाठी २५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. हॉटेल लाडली येथे लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. या लिलाव प्रक्रियेत संघ मालकांनी एक आयकॉन खेळाडू व १४ खेळाडू अशा १५ खेळाडूंची खरेदी लिलाव प्रक्रियेद्वारे केली.


छत्रपती संभाजीनगर प्रीमियर लीग स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन राहुल पाटील (युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी) आणि संदीप जाधव (जाधव क्रिकेट अकादमी) यांनी अथक परिश्रम घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून गरवारे क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण युट्यूबद्वारे करण्यात येणार आहे. भविष्यात उत्कृष्ट क्रिकेटपटू घडावा व लीगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर व इतर परिसरातून खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचे राहुल पाटील व संदीप जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *