
नाशिक ः आग्रा येथे आयोजित १८व्या राष्ट्रीय ताज ट्रॉफी अंडर १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी हिमांशू वराडे याची निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे झालेल्या तिसऱया राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत त्रिशन घोष, राहुल परमार, मोहित थोरी, देवांश चांगले यांनी कांस्य पदक प्राप्त केले व समीक्षा बोडके हिने २ सुवर्ण व २ रौप्य पदक प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून मान मिळवला.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे पीइएस संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भाई ठक्कर, सचिव देवेंद्र पटेल, स्पोर्ट्स सचिव हर्षद पटेल, मुख्याध्यापक गणेश पंडिधर, लता पटेल व मार्कोस कीचे चेअरमन राहील ध्रुवा यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून मंगेश राऊत व मार्कोस क्रीडा प्रशिक्षक टीम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.