
मुंबई ः क्रीडा भारतीतर्फे आदर्श क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त विनायक मरळे यांचा वडाळा-नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सत्कार केला. आमदार कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयात हा सत्कार कारण्यात आला. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर यांनी विनायक मरळे यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.