निफाडच्या क्रीडा सह्याद्री संघाला राज्य लगोरी स्पर्धेत तृतीय क्रमांक 

  • By admin
  • May 7, 2025
  • 0
  • 39 Views
Spread the love

नाशिक ः पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत निफाडच्या क्रीडा सह्याद्री संघाने तृतीय क्रमांक मिळवला. 

महाराष्ट्र लगोरी असोसिएशन व पुणे जिल्हा लगोरी असोसिएशनतर्फे नवव्या ज्युनियर लगोरी राज्य अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी वरवंड (पुणे) येथील नागनाथ माध्यमिक विद्यालयात उत्साहात संपन्न झाली. यामध्ये क्रीडा सह्याद्री खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत मुला व मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र लगोरी असोसिएशनचे अध्यक्ष व मुख्य संयोजक माजी आमदार अनिकेत तटकरे, तुषार जाधव, राहुल दिवेकर, संजय जाधव, दत्तात्रय दिवेकर, प्रदीप दिवेकर, चवळे, डॉ विजय दिवेकर, महाराष्ट्रातील जिल्हा सचिव, पंच व क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी एकूण १५ संघांनी सहभाग नोंदवला होता. नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱया निफाड क्रीडा सह्याद्री संघात कर्णधार सुमेध बोदडे, दक्ष गायकवाड, आदित्य वाघ, नयन शर्मा, अवनीश कुंदे, वेदांत कुंदे व कर्णधार करुणा
शिंदे, आराध्या सालमुठे, श्रद्धा मोगल, वेदिका कुशारे, अनुष्का कुशारे, कृतिका मोगल, मोक्षदा जाधव, तमन्ना तांबोळी आणि करिष्मा तांबोळी यांनी उत्कृष्ट खेळ करत नाशिक संघाला तृतीय क्रमांक मिळवून दिला.

महाराष्ट्र लगोरी असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत तटकरे, नाशिक जिल्हा लगोरी संघटक व क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड, महाराष्ट्र असोसिएशनचे सदस्य तुषार जाधव, राजेंद्र पाटील, क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे सदस्य विनोद गायकवाड, चेतन कुंदे, दत्तू रायते, रमेश वडघुले, प्रतीक्षा कोटकर, विजय घोटेकर, कीर्ती कोटकर, श्याम चौधरी यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या संघाला क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *