
बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यातर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त निमित्त पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पोलिस बॉईज संघाने विजेतेपद पटकावले. शिवबा वॉरियर्स या संघाने उपविजेतेपद संपादन केले.
पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धा पुरुष ओपन गटात घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन बजाजनगर येथील भैरोमल तनवाणी विद्यामंदिर या ठिकाणी करण्यात आले होते. बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक हनुमान भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते कैलास भोकरे, कडूबा चोपडे, ज्योती चोपडे, उमेश दुधाट, आय जी जाधव, व्यंकट महिलापुरे, बालाजी शिंदे, बाळू खराडे, दत्ता आघाव, सौरभ चित्रक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेसाठी वाळूज पंचक्रोशीतील विविध संघांनी सहभाग नोंदविला होता. पंच म्हणून प्रा नारायण शिंदे, चंद्रशेखर जाधव, शेख शफी, प्रफुल कुलकर्णी यांनी पंचाची कामगिरी बजावली.
या स्पर्धेत पोलिस बॉईज संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला ट्रॉफी व ३१०० रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. अनिकेत शेटे (कर्णधार), प्रणित जावळे, धीरज बडे, अनिकेत कौरासे, सुमित म्हस्के, ऋषिकेश सोनार या टीमने ट्रॉफी जिंकली. उपविजेतेपद शिवबा वॉरियर्स संघाने संपादन केले. या संघाला २१०० रोख रुपये व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या संघात सुनील छिपा (कर्णधार), उमाकांत कावळे, योगेश खाडे, संदीप ठाकरे, रमेश देवतवाल, आलोक गोरडे, निलेश सानप, ताराचंद गायकवाड यांचा समावेश आहे.
बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा कैलास जाधव, उपाध्यक्ष अण्णा चव्हाण, सचिव शेख शफी, कोषाध्यक्ष सी के जाधव, रामेश्वर वैद्य, कार्याध्यक्ष समाधान हराळ, दत्ता पवार, अमोल मुंगीकर व बीएसएफच्या सर्व संचालक मंडळ व क्रीडा शिक्षक यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले आहे. सूत्रसंचालन दत्ता पवार यांनी केले. चंद्रशेखर जाधव यांनी आभार मानले.