राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी ज्वेलर्स विजेते

  • By admin
  • May 7, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत एलआयसी प्रायोजित विनाशुल्क अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धा दादर-पश्चिम येथे जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत राज्यख्यातीच्या खेळाडूंनी सजलेल्या एमडीसी ज्वेलर्स संघाने धमाकेदार खेळ करत अंतिम लढतीत बाजी मारली.

पहिल्याच सामन्यात एमडीसीच्या सार्थक केरकर याने राष्ट्रीय शालेय कॅरमपटू तनया दळवी हिचा २५-० असा नील गेमने धुव्वा उडवत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, प्रत्युत्तरादाखल जैतापूरच्या आर्यन राऊत याने वेदिका पोमेंडकरवर २५-० अशी मात करत सामना १-१ ने बरोबरीत आणला. निर्णायक लढतीत अमेय जंगम याने अर्णव गावडेवर १७-११ अशी मात करत एमडीसी ज्वेलर्सला अजिंक्यपदाचा मान मिळवून दिला.

तृतीय क्रमांकासाठी देखील जोरदार झुंज
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व सिबिईयु वॉरियर्स यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची झाली. मयुरेश पवार आणि प्रसाद माने यांनी अनुक्रमे प्रतिस्पर्ध्यांना नील गेम देत सामना बरोबरीत आणला. अखेरच्या सामन्यात श्रीशान पालवणकर याने उमैर पठाणचा २५-५ असा पराभव करत आत्माराम मोरे प्रतिष्ठानला तिसऱ्या क्रमांकावर विराजमान केले.

पारितोषिक वितरण सोहळा

या भव्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ, क्रीडापटू राजीव अडसूळ यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या स्पर्धेत गोविंदराव मोहिते फायटर्स, आनंदराव अडसूळ प्लॅटिनम, अभिजित घोष फेअर प्ले, अविनाश नलावडे स्पोर्ट्स या संघांनी लक्षवेधक कामगिरी नोंदवली आहे. 
या स्पर्धेत पंच म्हणून संतोष जाधव, सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर, अविनाश महाडिक, अर्जुन कालेकर, वेदांत महाडिक, ओमकार चव्हाण, प्रॉमिस सैतवडेकर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून उत्कृष्ट योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *