
मुंबई : दि पार्क क्लब आणि कुणाल डेरे स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी पार्क येथे भव्य टेबल टेनिस स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आले होते. शहरातील तरुण खेळाडूंनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला आणि उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि क्रीडाभावाचे सुंदर दर्शन घडवले.
या स्पर्धेतील झगमगते तारे ठरले विराज अजगावकर आणि तनिष्क शिंदे. त्यांनी आपल्या जबरदस्त खेळानं प्रेक्षकांची मनं जिंकत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. विशेष उल्लेख करावासा खेळ दाखवला आरीश थवानी याने. त्याने अंडर १५ गटात झुंजार लढतीत झीअस करारियाला पराभूत करुन विजेतेपद पटकावले.
ही स्पर्धा केवळ खेळाडूंसाठी मंच नव्हती, तर ती होती संयोजन कौशल्याचं जिवंत उदाहरण! सुरेख आयोजनामागे कार्यरत असलेल्या समितीच्या मेहनतीला मानाचा मुजरा! अध्यक्ष वरदा चुरी, क्रीडा सचिव दीपक पंडित, किरण जोशी आणि मोहित पटवर्धन यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले.