
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा : आदर्श नागोजी सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत मॉडेल क्रिकेट अकॅडमी ब संघाने साउथ सोलापूर आपटे ग्रुपवर ८ गडी राखून विजय मिळविला.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या साउथ सोलापूरने सर्वबाद १७६ धावा केल्या. विजयी १७७ धावांचे लक्ष्य मॉडेल अकादमीने दोन गडी गमावित गाठले. पाच बळी टिपणारा आदर्श नागोजी सामन्याच्या मानकरी ठरला. ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू के टी पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी विक्रांत पवार, प्रवीण देशेट्टी, वैभव इराबत्ती व केयुरेश पवार उपस्थित होते.
प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून अतिक शेख व नितीन गायकवाड तर गुणलेखक म्हणून सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक
साऊथ सोलापूर आपटे ग्रुप : २५.४ षटकात सर्वबाद १७६ (चेतक गोरे नाबाद ७७, मंदार काळे २५, निरंजन कदम २० धावा, आदर्श नागोजी ५ बळी, सुदेश राठोड व प्रथमेश राठोड प्रत्येकी २ बळी) पराभूत विरुद्ध मॉडेल क्रिकेट अकॅडमी (ब) : २९.१ षटकात २ बाद १७७ (विवेक अनची नाबाद ६६, अक्षय हावळे ४८, वैष्णव जावळे नाबाद ४६, रोहित जोशी व ओंकार भांबुरे प्रत्येकी १ बळी).