छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजही दिशादर्शक – समीर मुळे

  • By admin
  • May 7, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे संस्थेचे विश्वस्त समीर मुळे आणि सचिव पद्माकरकाका मुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जाती अंताचा लढा यांसह कृषी-सिंचन, औद्योगिक क्षेत्रातील विकासात्मक दृष्टी त्यातून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजही दिशादर्शक आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट प्रथा, रुढी परंपरांना विरोध करून बंदी घातली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात संस्थेचे विश्वस्त समीर मुळे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ लता काळे, कृषी महाविद्यालय संचालक डॉ जगदीश जहागीरदार, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ गणेश डोंगरे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ शशिकांत डीकले, मानव संसाधन व्यवस्थापक अनिल तायडे पाटील, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, उपप्राचार्य आणि विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *