
छत्रपती संभाजीनगर ः राष्ट्रीय नाइन ए साईड फुटबॉल स्पर्धेसाठी रेफ्री बोर्ड कन्व्हेनरपदी प्रा एकनाथ साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. तसेच डी आर खैरनार यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
द हौशी नाइन ए साईड फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने येत्या १० ते १३ मे दरम्यान देवास (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील सब ज्युनियर, ज्युनियर मुले स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. रेफ्री बोर्ड चेअरमन दीप कुमार महंतो, कन्व्हेनरपदी प्रा एकनाथ साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून विष्णू सिंहारे, टेक्निकल कमिटी परवेज खान, अमित बलय्या, सदस्यपदी डी आर खैरनार यांची निवड करण्यात आली आहे, असे द हौशी नाइन ए साईड फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव प्रवीण सांगते यांनी जाहीर केले आहे.
प्रा एकनाथ साळुंके हे हौशी नाइन ए साईड फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव आहेत. या निवडीबद्दल नाइन ए साईड हौशी फुटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार, राज्य संघटनेचे पदाधिकारी संगम डंगर, दिनेश म्हाला, लालसिंग यादव, संतोष खेंडे, प्रमोद साव, प्रवीण अर्नाळे, समीर शेख यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.