
प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट ः शौर्य राजपूत सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत पीसीए९९ क संघाने पीसीए९९ ब संघावर ४४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात शौर्य राजपूत याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. अंडर १४ क्रिकेटपटूंना व्यापक खेळण्याची संधी मिळावी या हेतूने प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रोफेशनल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी सांगितले. या सामन्यात पीसीए९९ ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पीसीए९९ क संघाने प्रथम फलंदाजी करत २५ षटकात आठ बाद १५६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात पीसीए९९ ब संघ १९.२ षटकात ११२ धावांत सर्वबाद झाला. पीसीए९९ क संघाने ४४ धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात प्रतीक कदम याने अवघ्या ३३ चेंडूत ५४ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने ११ चौकार ठोकले. देवेंद्र याने नऊ चौकारांसह ६४ चेंडूत ५० धावा फटकावल्या. आर्यन जाधव याने अवघ्या ६ चेंडूंचा सामना करत १८ धावांचे योगदान दिले. त्याने दोन षटकार व एक चौकार मारला.
गोलंदाजीत प्रज्वल तिलकरी याने ३७ धावांत तीन विकेट घेतल्या. सोहम पिंपळे याने ९ धावांत दोन गडी बाद केले. शौर्य राजपूत याने २४ धावांत दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
पीसीए९९ क संघ ः २५ षटकात आठ बाद १५६ (अरुष राजगुरू १२, देवेंद्र ५०, युग शर्मा ५, शौर्य राजपूत १८, रुद्र शहाणे १०, अर्णव जोशी नाबाद १०, आर्यन जाधव नाबाद १८, इतर २७, प्रज्वल तिलकरी ३-३७, ज्योतिरादित्य राजगुरू २-३१, सोहम हार्के १-२५, विकी भोसले १-३२) विजयी विरुद्ध पीसीए९९ ब संघ ः १९.२ षटकात सर्वबाद ११२ (अनिश शिंदे १७, प्रतीक कदम ५४, ज्ञानेश्वरी बारगळ ८, इतर २४, शौर्य राजपूत २-२४, सोहम पिंपळे २-९, आर्यन जाधव २-१७, कृष्णा २-११, अनुराग सिंग १-२१). सामनावीर ः शौर्य राजपूत.