
पाटना : महाराष्ट्राच्या श्रावणी सतीश डिके हिने शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम साधत सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत लक्ष्यवेधी खेळ केला. मात्र, सुवर्णपदकाची दावेदार असूनही अखेर तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
श्रावणी डिके हिने केरळच्या इजारा सुनील व पश्चिम बंगालच्या दीप्ती अधिकारी हिचा वाजारी डाव घेऊन पराभव केला. तिने तिसर्या सामन्यात दिल्लीच्या इशू कौशिकचा इपॉनवर पाडाव करीत अंतिम फेरी गाठली. मात्र, सुवर्णपदकाच्या लढतीत गुजरातच्या खुशबू दर्जाडा हिच्याकडून श्रावणीचा बाजारी डावावर पराभव झाल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. श्रावणी ही डॉक्टर रवीभूषण कदम यांची विद्यार्थींनी असून, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात ती सराव करते.