
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रीसिजन क्रिकेट स्पर्धा – पुष्प अकादमीचे आव्हान संपुष्टात
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रीसिजन क्रिकेट स्पर्धेत अ गटात मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूट व मॉडेल क्रिकेट अकादमी यांच्यात ९ मे रोजी अंतिम लढत होणार आहे. अंतिम सामन्यानंतर अ व ब गटाचे पारितोषिक वितरण होईल.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या उपांत्य सामन्यात मध्य रेल्वे संघाने पुष्प अकादमी संघास १०७ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. वेदांत काळे सामन्याचा मानकरी ठरला. वरिष्ठ क्रिकेटपटू वासुदेव दोरनाल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश मालप व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. अशोक डोंबाळे व नितीन गायकवाड यांनी पंच म्हणून गुणलेखक सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक
मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूट ः ३८.१ षटकांत सर्वबाद १९१ (प्रवीण देशेट्टी ५६, वेदांत काळे ४७, यश बोरामणी १२ धावा, अजय माने व मयूर राठोड प्रत्येकी ३ बळी, नदीम शेख २ बळी) विजयी विरुद्ध पुष्प जिमखाना क्रिकेट अकॅडमी ः १८.४ षटकांत सर्वबाद ८४ (ओंकार घांदट १७, आदर्श सिंग १३, प्रशांत घोडके व नदीम शेख प्रत्येकी १२ धावा, आशिष अवळे ३ बळी, यश बोरामनी व अमन सय्यद प्रत्येकी २ बळी).