छत्रपती संभाजीनगरची वादळी फलंदाजी

  • By admin
  • May 8, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

राघव नाईक, आदित्य शिंदे यांची धमाकेदार शतके, जळगाव संघावर मात 

छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए  अंडर १६ निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने वादळी फलंदाजी करत जळगाव संघावर पहिल्या डावात ८३ धावांची आघाडी घेऊन बाजी मारली. निर्धारित वेळेत हा सामना अनिर्णित राहिला.

एडीसीए क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. जळगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ८३.२ षटकात सर्वबाद २४६ धावा काढल्या. छत्रपती संभाजीनगर संघाने ५७.५ षटके फलंदाजी करताना दोन बाद ३२९ धावसंख्या उभारुन पहिल्या डावात आघाडी घेतली. या वादळी फलंदाजीमुळे छत्रपती संभाजीनगर संघाला पहिल्या डावाच्या आघाडीवर बाजी मारण्यात यश आले.

या सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या राघव नाईक व आदित्य शिंदे या फलंदाजांनी धमाकेदार शतके ठोकून सामना गाजवला. राघव नाईक याने  १८४ चेंडूंचा सामना करत १६८ धावांची स्फोटक खेळी साकारली. राघवने २४ चौकार मारले. आदित्य शिंदे याने १६० चेंडूत १५५ धावांची जलद खेळी केली. आदित्य याने आपल्या शतकी खेळीत तब्बल २७ चौकार मारले. जळगावच्या मानस पाटील याने १४० चेंडूत ८३ धावा काढल्या. त्याने १६ चौकार मारले. 

गोलंदाजीत मुफद्दल ताहेर टाकसाळा (३-२९), अभिराम गोसावी (३-५२) व ध्रुव पुंड (२-४३) यांनी प्रभावी गोलंदाजी करत सामना गाजवला.

संक्षिप्त धावफलक

जळगाव टीम ः ८३.२ षटकात सर्वबाद २४६ (मानस पाटील ८३, दक्ष अटोळे ३४, श्लोक महाजन ५३, रुद्र पाटील २९, अभिराम गोसावी ३-५२, मुफद्दल ताहेर टाकसाळी ३-२९, ध्रुव पुंड २-४३, अर्श कुरेशी १-६६, मोहम्मद अली १-१३).

छत्रपती संभाजीनगर ः ५७.५ षटकात दोन बाद ३२९ (राघव नाईक १६८, आदित्य शिंदे १५५, अर्णव मांगळुरकर नाबाद २ विराज मांधवानी १-५४, आर्यन पाटील १-७१). सामनावीर ः राघव नाईक. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *